राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्यासाठी गणरायाला घातले साकडे
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच व्हावे म्हणून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह अष्टविनायक गणपती मंदिरावर देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाएवढा प्रसाद अर्पण करण्याचे नवस घेऊन साकडे घातले.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा
भाजप महायुतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले असून, केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षश्रेष्ठींकडून ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे, ज्यात त्यांनी केंद्रातील मंत्रीपद किंवा राज्यातील उपमुख्यमंत्रीपद यापैकी एका पदाची निवड करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचे दोन केंद्रीय निरीक्षक शुक्रवारी मुंबईत दाखल होणार असल्याने राजकीय हालचालींना गती येणार आहे. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे, त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीत पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच?
महायुती सरकारच्या खातेवाटपाच्या आधीच पालकमंत्री पदावरून वाद पेटल्याचे दिसत आहे. नाशिक, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजप व राष्ट्रवादीचा दावा आहे, तर रायगडमध्ये भरत गोगावले (शिवसेना) आणि आदिती तटकरे (राष्ट्रवादी) यांची नावे चर्चेत आहेत. सिंधुदुर्गसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस आहे. या वादामुळे खातेवाटप प्रक्रिया आणखी रखडण्याची शक्यता आहे.