राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं. तब्बल 132 जागा जिंकत भाजपनं सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पुन्हा मिळवला. तर एकनाथ शिंदे शिवसेना 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 41 आमदार निवडून आणत दमदार कामगिरी केली. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर घोडं अडलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवरून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी काँग्रेसने केली आहे. ठाकरे गटानेही विचार सुरू केला आहे. शरद पवार यांनी देखील पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना वेळ प्रसंगी तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विरोधी पक्षांकडून अशा पद्धतीने पुन्हा ईव्हीएमला टार्गेट केले जाऊ लागले आहेत. यातच आता या सर्व घडामोडींनंतर भारतीय जनता पार्टीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेच ईव्हीएम मशीनवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मविआ) मोठं यश मिळवलं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं का, असा सवाल बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) विचारला.
चाकी चालकांसाठी नवा नियम! आता दोघांना हेल्मेट सक्ती
पुढे बावनकुळे म्हणाले, तुम्ही नांदेडची पोटनिवडणूक जिंकलात आम्ही तिथे पराभूत झालो. जर ईव्हीएम हॅक करून मतं घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तशी मतं घेतली नसती का? विरोधकांचा हा खोटारडेपणा आहे. त्यांचा पराभव झाला आहे पण ते तो स्वीकारत नाहीत. मला वाटतं की आता त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावं.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं. निवडणुकीतील अपयशातून आम्ही काही गोष्टी नक्कीच शिकलो. पुढं काय करायचं त्याची रणनीती ठरली. प्रत्येक बूथवर जाऊन काम केलं. जनतेशी संपर्क साधला. त्यानंतर मतदानाचं प्रमाण देखील वाढलं होतं असे चंद्रशेखर बावनकुळे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले आहेत.