10 C
New York

Supreme Court : निवडणुकीत बॅलेट पेपर वापरा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन् विचारले ‘हे’ प्रश्न

Published:

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) निकाल जाहीर झाले आहे. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) प्रचंड बहुमतासह दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. या निवडणुकीत 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर यश मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम (EVM) मशीनचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देशातील निवडणुकीत बॅलेट पेपरद्वारे (Ballots Paper) मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) मोठा दिलासा मिळाला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ (Justice Vikram Nath) आणि पीबी वराळे (Justice PB Varale) यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केली जात नाही आणि निवडणुका हरल्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते. असं या खंडपीठाने म्हटले आहे.

आपण 150 हून अधिक देशांमध्ये गेलो आहे असं याचिकाकर्ते केए पॉल म्हणाले. तेव्हा खंडपीठाने त्यांना विचारले की मतदान बॅलेट पेपरद्वारे केले जाते की प्रत्येक देशात इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर केला जातो. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, परदेशात बॅलेट पेपर मतदानाचा मार्ग स्वीकारला आहे आणि भारतानेही तेच केले पाहिजे.

महाविकास आघाडीत बिघाडी होणार?

खंडपीठाने विचारले की, तुम्हाला इतर जगापासून वेगळे का व्हायचे नाही? पॉल म्हणाले, देशात भ्रष्टाचार आहे आणि या वर्षी (2024) जूनमध्ये निवडणूक आयोगाने 9,000 कोटी रुपये जप्त केल्याचे जाहीर केले. त्यावर खंडपीठाने विचारले की, जर तुम्ही बॅलेट पेपरवर परत गेलात तर भ्रष्टाचार होणार नाही का? पॉल यांनी दावा केला की टेस्लाचे सीईओ आणि सह-संस्थापक एलोन मस्क म्हणाले की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते तसेच त्यांनी यावेळी टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही दावा केला होता की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते. असं याचिकाकर्ते केए पॉल म्हणाले.

यावेळी खंडपीठाने म्हटले की, चंद्राबाबू नायडू पराभूत झाले होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते. आता यावेळी जगन मोहन रेड्डी यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते असं खंडपीठाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img