11.8 C
New York

Mahavikas Aghadi : ‘आता मागे हटायच नाही, लढायचं’, ईव्हीएमविरोधात ‘मविआ’ मैदानात

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात ईव्हीएम (EVM) विरोधात विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार देशात इंडिया आघाडी (India Aghadi) आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi ) ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची तयारी करत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाच्या पराभूत आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला. त्यामुळे आता महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. तसेच आता ईव्हीएमविरोधात शरद पवार आणि उद्धव ठकारेंनी मोठं आंदोलन उभं करण्याचं आवाहन केला आहे.

आमदारासोबत झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या बैठकीत 28 तारखे पर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशीही सूचना सर्वच पराभूत उमेदवारांना देण्यात आले आहे. तसेच संपूर्ण देशात इंडिया आघाडीकडून देखील ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी या बैठकीत दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्रिपदी भाजपचाच चेहरा की मास्टरस्ट्रोक…कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

तर महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुधाकर भिका बडगुजर यांनी नाशिक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ईव्हीएमबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 125- विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. मात्र या निकालावरती संशय निर्माण झाले आहे. त्यामुळे आक्षेप नोंदवत आहोत. 26-04-2024 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुक निकालानंतरही 7 दिवसाच्या आतमध्ये EVM आणि VVPAT च्या पडताळणीची मागणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करू शकतात. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने सोबत मतदान केंद्राची यादी जोडलेली असुन त्यानुसार EVM मायक्रो कंट्रोलर व VVPAT ची पडताळणी करून निर्माण झालेला संशय दूर करावा ही विनंती. असं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडी फक्त 46 जागांवर यश आला आहे तर इतरांना 3 जागा मिळाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img