10.3 C
New York

Amit Shah : 28 नोव्हेंबरला शपथविधी, अमित शहा आज मुंबईत

Published:

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकीकडे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उद्या मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमित शहा निरीक्षक म्हणून उद्या मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विद्यमान विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस; राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज मोठा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) देखील उद्याच उपमुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांनुसार नवीन मुख्यमंत्री 28 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहे. तर पुढील ढील दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासह मंत्रिपदांच्या वाटपाबाबतच सूत्र आणि मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या रिसेप्शनसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज रात्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img