महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. संजय वर्मा यांची यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी नियुक्ती केली होती. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी आता राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा संपताच होताच पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Rashmi Shukla महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक बनण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र केडरच्या रश्मी या 1988 च्या बॅचच्या अधिकारी असून, त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकही काम केले आहे. रश्मी शुक्ला या जूनमध्ये निवृत्त होणार होत्या, मात्र सरकारने त्यांना मुदतवाढ दिली. त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळेही चर्चेत होत्या. वयाच्या 22 व्या वर्षी आयपीएस बनण्याचा विक्रमही रश्मी शुक्ला यांच्या नावावर आहे.
अजितदादा अन् शरद पवार कधीही एकत्र येतील, अजितदादांच्या निकटवर्तीयाचे मोठे विधान…
Rashmi Shukla फोन टॅपिंगचा आरोप
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, तेव्हा काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्याच्यावर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.