महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश संपादन केले आहे. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं आहे. 132 जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतीची माहिती अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे काही वेळा आधी राजभवनावर गेले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा गेली तर ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळतील.
Devendra Fadnavis नगरसेवक ते मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. नागपूर महापालिकेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. नागपूर महापालिकेतून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. नगरसेवक म्हणून नागपूर महापालिकेत त्यांनी राजकीय जीवनात पाय रोवले. ते नगरसेवक अवघ्या 22 व्या वर्षी झाले होते. मग सर्वात तरूण महापौर असल्याची नोंद फडणवीसांच्या नावावर आहे. नंतर ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले. भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळलं आहे. अवघ्या 44 व्या वर्षी 2014 ला ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कमी वयात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवारांनंतर ते दुसरे नेते ठरले. महाविकास सरकारच्या काळात 2019 ला त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.
निवडणुकीत बॅलेट पेपर वापरा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन् विचारले ‘हे’ प्रश्न
भारतीय जनता पक्षाचे त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद देखील सांभाळले. त्यांच्या नेतृत्वात भाजपने 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन केले. वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कमी वयात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार यांच्यानंतर ते दुसरे नेते ठरले. तर 2019 मध्ये त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्वाची पदे सध्या 2022 पासून त्यांच्याकडे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बिहार आणि गोवा राज्यात देखील भाजपचे सरकार आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मॉडेलिंग
देवेंद्र फडणवीस यांची पर्सनॅलिटी पाहून त्यांचे बालपणीचे मुख्यमंत्री विवेक रानडे यांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. देवेंद्र फडणवीसही त्यासाठी तयार झाले. 2006 ला त्यांनी नागपुरातील एका कपड्याच्या दुकानासाठी फोटोशूट केलं होतं.