विधानसभेचा निकालात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलय. आता मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावं, यासाठी आग्रही आहेत. (Eknath Shinde) शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांसमोर तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केलं आहे.
अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत त्यामुळे आज निर्णय होऊन शपथविधी होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपाने निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी भाजपाकडून दबाव सुरू आहे. तसंच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
विद्यमान विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस; राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?
Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी काय पोस्ट केली?
आपले सरकार राज्यात महायुतीच्या प्रचंड विजयानंतर पुन्हा एकदा स्थापन होणार आहे. आपण महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. काही मंडळींनी माझ्यावरील प्रेमापोटी सर्वांना एकत्र जमण्याचं, मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे. मी अत्यंत मनापासून तुमच्या या प्रेमासाठी ऋणी आहे. मात्र, माझ्या समर्थनार्थ अशा पद्धतीने कुणीही एकत्र येऊ नये, असं आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.