राज्यात आज 14वी विधानसभा विसर्जित झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहणार आहेत. राज्यात (Maharashtra CM) आज 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे.
आज, 26 नोव्हेंबर रोजी सरकारचा कार्यकाळ संपलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अन् देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी 11 वाजता राजभवानावर राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. आता नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
मंत्रिपदासाठी महायुतीच्या आमदारांची रस्सीखेच! इच्छुकांचा आकडा वाढला
राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.
नव्या सरकारचा शपथविधी कधी ? होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. महायुतीकडून पुढील मुख्यमंत्री कोण असतील, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. भाजपकडे बहुमत आहे, देवेंद्र फडणवीस यांना 178 आमदारांचा पाठिंबा असून फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी भाजप नेते आग्रही असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार देखील शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलीय. मंत्रिपदासाठी इच्छूकांच्या नावांची संख्या देखील वाढत आहे.