महायुतीला प्रचंड बहुमत विधानसभा निवडणुकीत मिळाले असून 41 जास्त जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून यातील 10 जागांवर प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाला समाधान मानावे लागले आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यानंतर यशवंतराव चव्हाणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा स्मृतीस्थळी येत आदरांजली वाहिली. याचवेळी अजित दादा आणि त्यांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांची भेट झाली.
सोमवारी सकाळीच कराड येथील प्रीतीसंगम येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कर्जत – जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली. मोठ्या संख्येने यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. याचवेळी आमदार रोहित पवार हे काका अजित पवारांच्या समोर गेले आणि त्यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी त्यांना म्हटले की, “अभिनंदन बच गया… दर्शन घे दर्शन काकाचं” असे म्हणत रोहित पवारांना खाली वाकून पाया पडण्यास सांगितले. रोहित पवारांनी त्यावेळी अजित पवारांना पायाला हात लावत नमस्कार केला. पण अजित पवार इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभेतील निसटत्या विजयावरही भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी रोहित पवारांच्या विजयाच्या शुभेच्छा देत म्हटले की, “अरे ढाण्या थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं,” असा मिश्किल टोला रोहित पवारांना लगावला. त्यांच्या या विधानानंतर रोहित पवार यांच्यासोबत उपस्थित लोकही हासायला लागली. पण अजित पवारांनी रोहित पवारांना मारलेल्या या मिश्किल टोल्यामुळे जर का खरंच अजित पावरांची रोहित पवारांच्या मतदारसंघात सभा झाली असती तर ते पराभूत झाले असते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण या भेटीबाबत आणि अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत आता रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे बारामतीत गुंतून पडल्याने ते माझ्या मतदारसंघापर्यंत पोहोचले नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
Ajit Pawar रोहित पवारांचा निसटता विजय…
महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या कर्जत जामखेड विधानसभेत यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांना भाजपाचे विधान परिषदेतील आमदार राम शिंदे यांनी आव्हान दिले होते. या मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कारण या मतमोजणीवेळी कधी राम शिंदे पुढे असायचे तर कधी रोहित पवार. पण राज्यातील इतर निकाल पाहता रोहित पवारांचा पराभव होणार, असेच पाहायला मिळत होते. पण अखेरच्या क्षणाला रोहित पवारांनी हा विजय खेचून आणत राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केला.