6.2 C
New York

Nana Patole : नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार ?

Published:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. महायुतीला राज्यात बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीचा सुपडासाफ झाला आहे. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. विधानसभा नाना पटोले निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर दिल्लीला रवाना झाले होते. काँग्रेसच्या हायकमांडची त्यांनी २४ नोव्हेंबरला भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर काँग्रेसच्या गोटातून आज मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाना पटोले यांना काँग्रेसच्या हायकमांडने वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा नाना पटोले यांचा राजीनामा देण्याची तयारी असून राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून ते आज वरिष्ठांशी बोलून राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाना पटोले यांना जबाबदार धरत अपयशाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडले आहे. पटोलेंनी राजीनामा द्यावा, काँग्रस पक्षश्रेष्ठींकडे अशी मागणी केली होती. त्यानंतर पटोलेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

राज्यात 26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट? चर्चांना उधाण, जाणून घ्या इतिहास

महाराष्ट्र काँग्रेसमधील कलह येत्या काही दिवसांतअधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, खरगे यांच्यासह अनेक नेत्यांनी या निकालांचा तपशीलवार आढावा घेतल्याची चर्चा आहे.दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी ही निवडणूक जिंकू शकले. त्यांच्याशिवाय पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन ज्येष्ठ नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले सुमारे २०० मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थारोत यांचा संगमनेरमधून पराभव झाला आहे. 1985 पासून ते सातत्याने या जागेवर विजयी होत होते. तसेच कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांचा पराभव झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img