6.2 C
New York

Ministerial Post : नवं सरकार स्थापनेचा धडाका; कोणत्या महिलांची आमदारांची लागणार मंत्रि‍पदी वर्णी?

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुतीत महायुतीचा (Maharashtra Assembly Election 2024) बहुमताने विजय तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झालाय. या निवडणुकीमध्ये 236 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 22 महिला उमेदवारांनी (MLA) विजयाचा गुलाल उधळला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. आता या 22 महिला उमेदवार महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेत प्रतिनिधित्व करणार (Ministerial Post) आहेत. लवकरच आता महायुती सरकार आपल्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा करणार आहे, यात कोणत्या महिला उमेदवारांची मंत्रीपदी वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

विजयी झालेल्या महिला आमदारांमध्ये पाच महिला आमदार उत्तर महाराष्ट्रातील आहेत. या महिला आमदारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या देवयानी फरांदे तसेच नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, देवळालीमधून अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे, शेवगाव (जि. अहिल्यानगर) येथून भाजपच्या मोनिका राजोळे तसेच साक्रीमध्ये शिवसेनेच्या मंजुळा गावित या आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात तीन, मराठवाड्यात चार, मुंबईसह कोकण विभागातून आठ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दोन महिला विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत.

तू थोडक्यात वाचलास.. अजित दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

यंदा राज्याच्या विधानसभेत 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 18 महिलांना तिकीट दिलं होतं. त्यापैकी 15 महिला उमेदवारांची सरशी झाली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील दोन तर कॉंग्रेसची एक महिला उमेदवार विजयी झाली आहे. राज्यात आता 22 पैकी किती महिलांना मंत्रिपद मिळतं, याकडे मात्र संपूर्ण राज्यांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक महिला प्रतिधिनींची ही तिसरी आणि चौथी टर्म आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे या निवडून आल्या आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांची जबाबदारी होती. दरम्यान आता अनुशक्तिनगरमधून नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक देखील विजयी झाल्या आहेत. कोकण विभागात एकूण 08, उत्तर महाराष्ट्रात 05, मराठवाडा विभागात 04, विदर्भ विभागात 03 आणि पश्चिम महाराष्ट्र 02 महिला उमेदवार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img