महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस आहे.
तर दुसरीकडे 26 तारखेला विद्यमान विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे 26 तारखेपूर्वी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार का याबाबत देखील अनेक चर्चांना उधाण आले. 26 तारखेला विद्यमान विधानसभेची मुदत संपल्यानंतर सध्या सोशल मीडियावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची चर्चा देखील होताना दिसत आहे. मात्र माहितीनुसार, 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे किंवा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणे बंधनकारक नाही. राज्यात विधानसभेची मुदत संपल्यानंतर यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांचे शपथविधी झाले आहे.
दहावी विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली होती आणि 11व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर 2004 रोजी झाला होता. तर अकराव्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली होती आणि बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 7 नोव्हेंबर 2009 रोजी झाला होता. तसेच 31 ऑक्टोबर 2024 रोजी बाराव्या विधानसभेची मुदत संपली होती आणि 8 नोव्हेंबर 2014 रोजी तेराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. 9 नोव्हेंबर 2019 रोजी तर तेराव्या विधानसभेची मुदत संपली होती आणि 28 नोव्हेंबर 2019 रोजी चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. त्यामुळे वेळ सरकार स्थापन करण्यासाठी घेता येतो. नवीन सरकार 26 तारखेपूर्वीच अस्तित्वात आले पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही.
26 नोव्हेंबरला तर दुसरीकडे विद्यमान 14 व्या विधानसभेची मुदत संपणार आहे आणि 15 वी विधानसभा त्याआधी अस्तित्वात येणं गरजेचं आहे. त्यामुळे 15 व्या विधानसभेसाठी नोटिफिकेशन काढलं जाईल आणि15 वी विधानसभा नोटिफिकेशन निघाल्यानंतर संविधानात्मकरित्या अस्तित्वात येईल असं मानलं जाईल आणि त्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.