महायुतीला राज्यात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महिला मतदारांनी विधानसभा निवडणुकीतमोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं समोर आलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या संख्येत पाच लाखांनी वाढ झालीय. यामुळे महायुतीला (Mahayuti) सत्तेत बसविण्यात ‘लाडक्या बहिणीं’चा मोठा वाटा असल्याचं दिसतंय. आकडेवारीवरून हे स्पष्ट झालंय.
लोकसभा निवडणमुकीसाठी मे महिन्यामध्ये मतदान झालं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या संख्येमध्ये तब्बल अडीच लाखांनी वाढ झालीय. लोकसभा निवडणुकीमध्ये 21 मतदारसंघांत 20 लाख 79 हजार महिलांनी मतदान केलंय. तर विधानसभा निवडणुकीमध्ये 25 लाख 98 हजारहून अधिक महिला मतदारांनी मतदान केलंय. मतदानातील वाढलेल्या महिलांच्या या टक्क्यामुळे विधानसभा निवडणुकीची गणितं बदलली आहेत.
मविआच्या पराभवाला जबाबदार कोण? राऊतांनी स्पष्टच सांगितलं…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झालाय. त्यांचा थेट फायदा होत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. पुण्यातील सर्व मतदारसंघांमद्ये महिला मतदारांच्या टक्केवारीत देखील वाढ झाली. केवळ हडपसर मतदारसंघामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी महिलांचे मतदान झालं. तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. सात मतदारसंघात जवळपास 60 ते 70 टक्के तर दहा मतदारसंघात 50 ते 60 टक्क्यांदरम्यान महिलांनी मतदान केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांची नोंदणी विधानसभेला वाढली. मतदान केलेल्या महिलांची संख्या 5 लाख 18 हजार 651 आहे. नोंदणीमध्ये झालेल्या वाढीच्या तुलनेत मतदान केलेल्या महिलांच्या संख्येत थेट दुप्पट वाढ झाली. विधानसभा निवडणुकीत महिलांनी भरभरून मतदान केलंय. लोकसभा निवडणूकीत 39,93,071 महिला मतदारांनी नोंदणी केली होती, तर मतदान केलेल्या महिलांची संख्या 20, 79,631 होती. विधानसभा निवडणुकीमध्ये 42,69,569 महिला मतदारांनी नोंदणी केली होती, तर मतदान केलेल्या महिलांची संख्या 25,98,282 आहे.