महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. राज्यात महायुतीला 236 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर यश मिळालं. महायुतीत एकट्या भाजपने (BJP) 132 जागा जिंकल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil महायुतीच्या विजयात मराठ्यांचाही वाटा…
मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. आम्ही मैदानातच नव्हतो. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केलं होतं, मी समाजाला सांगितले होतं की, ज्याला निवडून आणायचं, ज्याला पाडयाचं त्याला पाडा. त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचे होते, ते केले. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला असून मराठ्यांनी तिथे तिथे त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलं, असा जरांगे म्हणाले.
अजितदादांनी सांगितला शेळके-मोदी भेटीचा किस्सा!
Manoj Jarange Patil मराठ्यांशिवाय पानही हलत नाही…
जरांगे फॅक्टरच्या अपयशाबद्दलही जरांगेंनी भाष्य केले आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. आमचा कोणतचाही फॅक्टर नव्हता. असा काही फॅक्टर असता तर महायुतीला इतके यश मिळाले नसते, असं जरांगे म्हणाले. मराठ्यांडे दीडशे होते, आता मराठा समाजाचे 204 आमदार निवडून आले. मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाहाी. मराठा फॅक्टर आणि जरांगे समजून घेण्यासाठी उभी हयात जाईल, आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे, हे कळणार नाही, असं जरांगे म्हणाले.
ते म्हमाले, राज्यात मराठ्यांचा नाद करू नये, मराठ्यांनी शेवटी 204 आमदार निवडून आणले. सरकार स्थापन झाले की, आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. आरक्षण दिले नाही तर सोडणार नाही. तुमचे सरकार स्थापन झाले की, लगेच उपोषणाची तारीख ठरवणार, मी पुन्हा बसणार असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला.
आमच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर सामूहिक उपोषण होणार, अ मराठ्यांच्या मनगाटाला मनगट लावायचे काम करायचं नाही. राज्यातील निम्मी गावे आमची आहेत. तुम्ही आमच्या मागण्या मान्य करायच्या, आमच्याशी बेईमानी करायची नाही, असंही जरांगे म्हणाले.