7.7 C
New York

Virat Kohli : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

Published:

पर्थमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत विराट कोहलीने (Virat Kohli) शतक झळकावले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहलीने फक्त 5 धावा केल्याने विराटवर टीका करण्यात येत होते मात्र दुसऱ्या डावात शतक झळकावून विराटने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे या शतकासह विराटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे.

पर्थमध्ये विराट कोहलीने आज दुसरा शतक झळकावलं आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात 7 शतके झळकावली आहेत. यासह त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात 6 शतके झळकावली होती. कोहलीने प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटीत शतक केले आहे. यापूर्वी त्याने जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शतक झळकावले होते.

विराट कोहलीने दुसऱ्या डावात 143 चेंडूत 100 धावा करत नाबाद राहिला. त्याने या दरम्यान 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर दुसरीकडे भारतीय संघाने आपला दुसरा डाव 487-6 धावांवर घोषित केला. सध्या या सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. भारतीय संघाकडे 533 धावांची आघाडी आहे. या डावात यशस्वी जैस्वालनेही शतक झळकावले. यशस्वीने 297 चेंडूत 161 धावांची खेळी खेळली.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 150 धावा करत्या आल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्टेलिया अवघ्या 104 धावांवर गारद झाला. पहिल्या डावानंतर भारताकडे 46 धावांची आघाडी होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img