8.5 C
New York

Manoj Jarange : निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा विजय झाला. यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली. पण ठीक आहे, उद्या आमचा आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

Manoj Jarange मराठ्यांचे 204 आमदार आले- जरांगे

एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. या राज्यात कोणीही मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत येऊ शकत नाहीत. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण मराठा समाजाला आम्ही सांगितलं होत जे करायचं ते करा. निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचंही मी दोघांचेही अभिनंदन करतो … मराठ्यांना मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी तिकीट दिले ना…, असं मनोज जरांगे म्हणालेत.

कॉंग्रेसने विदर्भ गमावला! 62 पैकी 50 जागांवर महायुतीचं वर्चस्व, दिग्गजांचा पराभव..

Manoj Jarange भुजबळांवर निशाणा

मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावं तरआणि मग म्हणावं. आमच्यामुळे हा आला आणि आमच्यामुळे तो आला… जेवढे लोक निवडून आलेत ना… त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. एखाख्या आमदाराने म्हणावं की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून आला नाही. तुमची सगळी हयात जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला जाईल.तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या कशाला नादी लागता. मैदानात मराठाच नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img