संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल जाहीर झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची लाट दिसून आली आहे आणि या लाटेच्या जोरावर महायुतीने 288 पैकी तब्बल 236 जागांवर बाजी मारली आहे तर महाविकास आघाडीला (MVA) फक्त 49 जागा जिंकत्या आल्या आणि इतरांना 3 जागा मिळाले आहे.
तर दुसरीकडे या निकालानंतर महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी (Rajya Sabha) कोण जाणार याची देखील चर्चा सध्या जोराने राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाले आहे. ज्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना ( ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी मिळणे अवघड आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त 49 जागा मिळाल्यानंतर शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांना पुढील राज्यसभेची मुदतही स्वबळावर मिळणार नाही.
राज्यातून राज्यसभेवर जाण्यासाठी 43 मतांची आवश्यकता असते. मात्र महाविकास आघाडीला फक्त 49 जागा जिंकता आल्याने आता महाविकास आघाडी फक्त एकालाच राज्यसभेवर पाठवू शकते. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अजितदादांनी सांगितला शेळके-मोदी भेटीचा किस्सा!
शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी यांची 3 एप्रिल 2020 रोजी सहा वर्षांच्या कालावधीसाठी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2026 रोजी संपणार तर संजय राऊत यांची 1 जुलै 2022 रोजी राज्यसभेवर निवड झाली होती त्यामुळे त्यांचा कार्यकाळ 22 जुलै 2028 रोजी संपणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी महायुतीने 236 जागा जिंकले आहे. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकले आहे तर शिवसेना( शिंदे गट) 57 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) 41 जागा जिंकले आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागा जिंकत्या आल्या आहे. त्यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) 20 , काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि समाजवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या आले तर 3 जागांवर इतरांनी बाजी मारली आहे.
विधानसभा निकालानंतर राज्यसभेत सर्वाधिक फायदा भाजपला होणार आहे. राज्यातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडले जातात. सध्या महाराष्ट्रात भाजपचे सात, काँग्रेसचे तीन, एकनाथ शिंदे शिवसेना (शिंदे गट) एक, शिवसेना (ठाकरे गट) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) एक सदस्य आहेत.