राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार आता पुन्हा एकदा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, भाजप-महायुतीने मोठी आघाडी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election Result) निकालात घेतली आहे. महायुतीला तब्बल 200 हून अधिक जागांवरआघाडी मिळाली. एकट्या विदर्भात महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत.
Election Result विदर्भात महायुतीला 50 जगाा
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी 2 जागा मिळाल्या होत्या. तर 7 जागा काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. मात्र, विधानसभेला विदर्भात महायुतीने मुसंडी मारली आहे. महायुतीला विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिवसेना शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षाला एक जागा मिळाली.
Election Result विदर्भात कोणाचा पराभव?
यशोमती ठाकूर
कॉंग्रेसच्या फायरब्रॅंड नेत्या यशोमती ठाकूर यांना पराभवला सामोरे जावे लागले. तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपने राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. यशोमती ठाकूर या विजयासाठी या मतदारसंघात प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र 21 फेऱ्यांनंतर राजेश वानखेडे यांना 8195 मतांची आघाडी होती. अखेर यशोमती ठाकूरांचा पराभव झाला. त्यांचा 7 हजार 974 मतांनी पराभव झाला.
अखेर शरद पवारांचा गड ढासळला; पश्चिम महाराष्ट्रात मिळाल्या केवळ 7 जागा
अनुजा केदार
कॉंग्रेसकडून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांनी सावनेर मतदारसंघात निवडणूक लढवली, तर भाजपकडून आशिष देशमुख त्यांच्या विरोधात रिंगणात होते. अंतिम फेरीत आशिष देशमुखांनी 1 लाख 18 हजार 906 मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी 26 हजार 522 मतांनी अनुजा केदार यांचा पराभव केला. यशोमती ठाकूर यांच्यासोबत डॉ. सुनील देशमुख, बच्चू कडू, राजेंद्र शिंगणे, सलील देशमुख यांनाही पराभवाचा हादरा बसला आहे.
Election Result महायुतीच्या विजयाची कारणे
महिलांसाठी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना विदर्भात निर्णायक ठरली. 1500 रुपये महिलांच्या खात्यात दरमहा मिळाल्याने महिलांनी महायुतीला कौल दिला. महायुतीच्या बाजूने याशिवाय पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांमुळे मतदारांवर प्रभाव पडून मतदार गेले. संघाचे सहकार्य, भापजच्या अन्य विंग्ज आणि फडणवीस यांचं सुक्ष्म नियोजन तसेच त्यांची मेहनत या देखील महायुतीच्या विजयातील महत्वाच्या बाबी आहेत.