तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी
बंगळूर : राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने बाजी मारली. बदलाची अपेक्षा करणाऱ्यांना मतदारांनी जोरदार धक्का देत स्थिर राजकारणासाठी काँग्रेसला आशीर्वाद दिला. या निकालामुळे काँग्रेसला संडूरची जागा राखून ठेवण्यात यश तर आलेच, शिवाय धजदची चन्नपट्टण व भाजपची शिग्गावची जागा हिसकावून घेण्यातही यश आले. त्यामुळे आता काँग्रेस सदस्यांची विधानसभेतील संख्या आता १३८ वर गेली आहे.
राज्याचा निकाल आधीच ठरला होता, नंतर निकालाचं चित्र बदललं; महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप
राज्याचा निकाल आधीच ठरला होता. पहिल्या दोन तासात बरोबरीची लढाई होती. नंतर निकालाचं चित्र बदललं, असा आरोप महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांनी केला आहे.
पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर
पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. महायुतीच्या राज्यातील विजयानंतर पुण्यात फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत. पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.