“सुनील त्यावेळी बाहेर थांबला..सगळे आमदार आत ह्याला कुणी आतच घेईना.. शेवटी मोदी साहेबांना सांगितलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्या. त्यांनीही सिक्युरिटीला सांगितलं कोण बाहेर आहे त्याला आत घ्या. मग मी सुनीलची मोदी साहेबांना स्वतंत्र ओळख करून दिली तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला.” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) मावळचे आमदार सुनील शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) भेटीचा किस्सा सांगितला.
खरंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळचा हा किस्सा आहे. पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली होती. या सभेसाठी मोदी पुण्यात आले होते. यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी स्वतः आमदार सुनील शेळके यांची ओळख करून दिली होती. याच भेटीचा किस्सा आज अजित पवार यांनी सांगितला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा झाली होती. मोदींच्या या सभेचा स्ट्राईक रेट चांगलात राहिला. वडगाव शेरी मतदारसंघ वगळता अन्य सात मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. वडगाव शेरीत अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांचा पराभव झाला. या ठिकाणी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले आहेत.
‘ठाकरेंचे पाच आमदार आमच्या संपर्कात’, शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!
या सभेतील भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांना शेळके यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यावेळी नतमस्तक होऊन शेळके यांनी मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हस्तांदोलन करत पंतप्रधानांनी शेळके यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
Ajit Pawar शेळकेंना एक लाखांचं मताधिक्य
मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांना 1 लाख 8 हजार 565 मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात महाविकास आघाडीने उमेदवार न देता अपक्ष बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता. मनसेनेही भेगडेंना पाठिंबा दिला होता. तरी देखील भेगडे यांना विजय मिळवता आला नाही. सुनील शेळकेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.