3.1 C
New York

Dhananjay Munde : परळी मतदारसंघात धनंजय मुंडे मुसंडी मारतील का?

Published:

मराठवाड्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत असलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मुसंडी मारतील का? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतः शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रणनीती आखली होती. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर नाही तर घड्याळावर लढवल्या जात आहे. त्यातच टपाली मतांचा कौल धनंजय मुंडे यांना नव्हता. पणत्यांनी मोठी आघाडी ईव्हीएम मतांमध्ये घेतली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या घड्याळाचा गजर या मतदारसंघात होणार का? की शरद पवार यांच्या डावपेचांना यश येईल हे लवकरच समोर येईल.

Dhananjay Munde लोकसभेला मोठा फटका

मराठावाड्यातील 8 मतदारसंघात केवळ छत्रपती संभाजीनगर येथील एक जागा जिंकण्यात महायुतीला यश आले होते. तर सात जागा त्यांच्या हातून निसटल्या होत्या. बीड जिल्ह्यात तर हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. रात्री उशीरा झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी तुतारी फुंकली होती. त्यांना 6500 मते मिळाली होती. या जिल्ह्यात सध्या विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. त्यात परळी आणि माजलगाव येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याचे कल पाहता, धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदाच परळी विधानसभा मतदारसंघात घड्याळाचा प्रयोग होत आहे. आतापर्यंत या मतदारसंघात कमळ फुलेले होते. यंदा घड्याळाचा गजर होणार की, शरद पवार पॉवर दाखवणार हे समोर येईल.

कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर, राम शिंदे यांना धक्का

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img