3.1 C
New York

Assembly Election : राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार?

Published:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पोस्टल मतमोजणीचे कल समोर आले आहेत. महायुती यातील बहुतांश मतदारसंघात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नुकतंच ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुती 134 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकासआघाडी 126 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर 15 जागांवर अपक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंची आघाडी, मिलिंद देवरा पिछाडीवर

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती 137 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यात भाजप 90 जागा, शिवसेना शिंदे गट 26 जागा, अजित पवार गट 21 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. तर महाविकासआघाडी 133 जागांवर आघाडीवर आहे. यात काँग्रेस 50 जागा, ठाकरे गट 40 जागा आणि शरद पवार गट 44 जागांवर आघाडीवर आहे.

Assembly Election राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार?

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये झालेली बंडखोरी, यानंतर पडलेली फूट आणि बदलेली राजकीय गणिते यामुळे यंदाच्या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आहे.ही पहिली विधानसभा निवडणूक राज्यातील राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सर्वांचं लक्ष त्यामुळे मतदारराजा नेमका कुणाला कौल देणार याकडे लागलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img