महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी – अशा प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करत. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी , समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केलं. गेली दोन-अडीच वर्षे महायुतीने जे काम केलं, त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. जनतेचे पुन्हा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) निकाल जाहीर होत आहे. निकालाचे कल सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीच्या बाजूने राहिले आहे. महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. त्याचवेळी खरी शिवसेना कोणाची? याचा कल मतदारांनी दिला आहे. जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरे यापूर्वी शिवसेनेचा निकाल लागणार असल्याचे सांगत होते. आता जनतेने आपला कौल विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिला आहे. मतदारांनी पसंती एकनाथ शिंदे यांची शिवसेनाला दिली आहे. ५३ जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आघाडी आहे. २३ जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आघाडी घेतली.
खरी शिवसेना कोणाची? याचा कल मतदारांनी दिला
Assembly Election अशी पडली होती शिवसेनेत फूट
२१ जून २०२२ रोजी शिवसेनेला जोरदार धक्का बसला होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ४० आमदार एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना कोणाची? हा वाद सुरु होता. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला होता. आता जनतेनेही निर्णय दिला आहे.