3.7 C
New York

Assembly Result : वळसे पाटीलांनी गड राखला,1014 मतांनी मैदान मारले

Published:

राज्याचे माजी गृहमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून (Assembly Result) पुन्हा एकदा बाजी मारली आहे. दिलीप वळसे पाटील 1014 मतांनी विजय झाले आहे. त्यांनी शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे कसाब विधानसभा मतदासंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. सुनील शेळके यांना 25 व्या फेरी अखेरीस 98280 मतांनी आघाडी घेतली आहे. तर बापूसाहेब भेगडे अपक्ष उमेदवार यांना 69022 मते मिळाली आहे.

महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

पुण्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार यांनी आपलं वर्चव्य सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी तब्बल 49 हजारांची आघाडी घेतली आहे. बारामती विधानसभा दहावी फेरी अखेर अजित पवार यांनी 49188 मतांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात महायुती 223 जागांवर महाविकास आघाडी 56 आणि इतर 9 जागांवर पुढे आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img