राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून महायुती (Mahayuti) सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजप हा राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेने दमदार कामगिरी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं आहे. आता, मोठी अपडेट राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत समोर आली आहे.
Mahayuti जाहिरात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनच दिवसांत 25 नोव्हेंबर रोजी महायुतीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभेत महायुतीचा नेता ठरवला जाणार आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदी याचाच अर्थ याच बैठकीत कोण असणार, यावर शिक्कामोर्तब या बैठकीत होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. तर, 26 नोव्हेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांचं पारडं जड, ठाकरेंचा कस लागला
Mahayuti भाजपचा मुख्यमंत्री होणार…
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या कलात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महायुतीमधील भाजपने 100 हून जागा मिळवल्या आहेत. भाजप 2014 मधील सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. भाजप 122 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. हा कल कायम राहिल्यास भाजपचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.