संपूर्ण राज्याचं लक्ष अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडच्या लढतीकडे लागलं होतं. (Assembly Election) कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदंचद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) विधानसभेच्या रिंगणात होते. रोहित पवार हे दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यामध्ये लढत झाली. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 260380 इतकं मतदानं झालं होतं. 74.94 टक्के कर्जत जामखेडमधील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीहोती. कर्जत जामखेडमध्ये पुरुष मतदारांचं मतदान 139033 इतकं मतदान झालं आहे. तर, महिला मतदाराच्या मतदानाची संख्या 121347 इतकी आहे. रोहित पवार पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर असल्याची माहिती आहे.
Assembly Election कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर
कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील अहमदनगर जिल्ह्यातील लढतीमुळं राज्यभरात चर्चेत होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर होती. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार गेल्या पाच वर्षांपासून आमदार म्हणून काम करत होते. भाजपनं विधानपरिषदेत शिंदे यांना संधी दिली होती.
महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी खास ‘प्लॅन’ तयार…
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीचा मुद्दा गाजला होता. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. रोहित पवार यांनी विधानभवनात या मुद्यावर आंदोलन देखील केलं होतं. रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांनी देखील संपूर्ण ताकद लावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे यांनी ताकद पणाला लावली होती. कर्जत जामखेडचे मतदार कुणाला संधी देतात हे मतमोजणीचं चित्र स्पष्ट होईल, तसं समजेल.