3.1 C
New York

Nawab Malik : मानखुर्द शिवाजीमध्ये नवाब मलिकांना धक्का; चौथ्या फेरीत अबू आझमी पुढे

Published:

महाराष्ट्रात सकाळी आठ वाजेपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election Result 2024) मतमोजणी सुरू झाली आहे. मानखुर्द शिवाजी नगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) आणि सपाचे विद्यमान खासदार अबू असीम आझमी यांच्यात लढत आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. चौथ्या फेरीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर अबू आझमी आघाडीवर आहेत.

मानखुर्द शिवाजीनगरच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मानखुर्द शिवाजी नगर हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हे उपनगरीय मुंबई जिल्ह्यात येते आणि एक सर्वसाधारण श्रेणीतील विधानसभा जागा आहे.

राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार?

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी 69,082 मतांनी विजयी झाले. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विठ्ठल गोविंद लोकरे यांचा पराभव केला, त्यांना 43,481 मते मिळाली होती. आझमी 25,601 मतांच्या फरकाने विजयी झाले झाले होते. त्यांना या भागात समाजवादी पक्षाला असलेला भक्कम पाठिंबा आहे. या भागातील मतदारांचा विश्वास सपावर दीर्घकाळ आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img