राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election) मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालांवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सत्ता स्थापनेच्या शर्यतीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोन्ही आघाड्यांत मोठी चुरस आहे. महाविकास आघाडीने बहुमत मिळाल्यास अनपेक्षित घडामोडी टाळण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार केल्याची माहिती समोर आली आहे. दगाफटका टाळण्यासाठी देखील मविआने मोठे पाऊल उचलले.
उमेदवारांचा डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय?
मविआला बहुमत मिळाल्यास त्यांच्या सर्व उमेदवार मुंबईत आणून सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मात्र, जर मविआला आवश्यक बहुमत न मिळाल्यास दुसरा पर्याय तयार करण्यात आला आहे. या परिस्थितीत विजयी उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे.