2.5 C
New York

Chhagan Bhujbal : ‘बंटेंगे तो कटेंगे’ राज्यात चालले नाही, पण…; निकालापूर्वीच भुजबळांचे मोठे विधान…

Published:

मतमोजणीला राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election)सुरुवात झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आता निकालापूर्वीच मोठं विधान केलं. महाराष्ट्रात बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं. तसेच महायुतीचे (Mahayuti) सरकार राज्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याचा निकाल हा स्पष्ट आहे. अनेक सर्वे करणाऱ्या संस्थांनी जनतेचा कल सांगितला. त्यामुळे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. कोणी म्हणतं बहुमतापेक्षा महायुतीला दहा जागा जास्त असेल, कोणी महायुतीला बहुमतापेक्षा दहा जागा जास्त मिळतील, कोणी म्हणतं पन्नास जागा जास्त, कोणी म्हणतं पंचवीस जागा जास्त. त्यामुळं महायुतीचेच सरकार बनणार आहे. महाविकास आघाडीला जनतेने नाकारले आहे.

मोठी बातमी! पहिला कल भाजपच्या बाजूने

कोणत्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या, त्यावर छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा चाललेला नाही. मात्र राज्यातील लोकप्रिय योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज हा मुद्दा महायुतीसाठी जमेची बाजू ठरला. मुलींना मोफत शिक्षण हा मुद्दाही चालेलला आहे. महायुती सरकारने गरिबांना अनेक चांगल्या योजना दिल्या आहेत, त्या योजनेमुळं लोकांनी महायुतीला कौल दिल्याचं भुजबळ म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img