सर्वच कल राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result) हाती आले असून निकालानूसार महायुतीच वरचढ ठरली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपला गड कायम राखला असून नाशिकमधील येवला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपणच येवल्याचे किंग असल्याचं सिद्ध करुन दाखवलंय. मागील काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भुजबळांना पाडण्याबाबतचे आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलं होतं. मात्र, जरांगेंच्या या आवाहनाला पार करीत छगन भुजबळ मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा विधानसभेवर गेले आहेत.
नाशिकच्या येवला मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या मतदारसंघाचं चित्र क्लिअर झालं असून महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत छगन भुजबळ निवडून आले आहेत. एकूण 1 लाख 31 हजार 945 मते मिळाली छगन भुजबळ यांना असून 1 लाख 5887 मते माणिकराव शिंदे यांना मिळाली आहेत. 26 हजार मतांनी भुजबळ यांनी शिंदे यांचा पराभव करुन मीच येवल्याचा किंग असल्याचं सिद्ध करुन दाखवलंय.
काँग्रेसला लातुरमध्ये मोठा धक्का! अमित देशमुख यांचा पराभव
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी आव्हान उभं केलं आहे. भुजबळांना पहिल्यांदाच मोठं आव्हान असल्याचं दिसत होतं, पण आपल्या विजयाबाबत भुजबळ निर्धास्त होते त्यांनी आपला विजय पक्का असून आपण 60 ते 70 हजार मताच्या फरकाने विजयी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. अखेर या निवडणुकीत भुजबळांनी विजय मिळवून दाखवलायं.