राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्रातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections Result 2024) रिंगणात आहेत. येथे त्यांची थेट लढत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार केदार प्रकाश दिघे यांच्याशी आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
मतमोजणीच्या चार फेऱ्यांमध्ये एकूण 31601 मतांची मोजणी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे 25,023 मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार केदार प्रकाश दिघे यांना केवळ 5888 मते मिळाली आहेत.
उमेदवारांचा डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय?
सध्याच्या निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात लोकराज्य पक्षाचे बाबूकुमार कांबळे यांना 59, प्रजासत्ताक बहुजन सेनेच्या सुशीला कांबळे यांना 46 मते मिळाली. याशिवाय पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून पाच अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. यामध्ये अहमद अफजल शेख यांना 17, जुम्माम अहमद यांना 54, मनोज शिंदे यांना 91, मुकेश तिवारी यांना 19 आणि सुरेश पाटीलखेडे यांना 44 मते मिळाली.