10.3 C
New York

Dhananjay Munde : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय

Published:

महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यामध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

Dhananjay Munde 2019 मध्ये मुंडे भावा-बहिणीत झाली होती लढत

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा 30 हजार 701 मतांनी पराभव झाला होता.

धनंजय मुंडे मागील 22 वर्षांपासून परळीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते कृषी मंत्रीपदापर्यंत त्यांनी काम केलं आहे. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. ओबीसी समाजाचाही त्यांना पाठिंबा आबे. त्यातच यावेळी त्यांना पंकजा मुंडेंचीही साथ मिळाली आहे. पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या.

राधाकृष्ण विखे पाटलांचा करिष्मा; सलग सातव्यांदा विधानसभेवर जाणार

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img