4.2 C
New York

Assembly Election : काँग्रेसला लातुरमध्ये मोठा धक्का! अमित देशमुख यांचा पराभव

Published:

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित देशमुख यांच्या सांगता सभेसाठी त्यांचा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुखने खणखणीत भाषणं केलं. रितेशने या मंचावरुन लातूरच्या तरुण पिढीला अमित देशमुख यांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्यामुळे रितेशचं हे भाषण तुफान गाजतंय. ‘लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस.. ते म्हणजे अमित भैय्या’, असं म्हणत अमित देशमुखांचं कौतुक त्याने या व्यासपीठावरुन केलं आहे.

आता अमित देशमुख यांच्या सभेतही रितेशने विरोधी उमेदवाराचं नाव न घेता जोरदार घणाघात केला. तसेच रितेशच्या जबरदस्त डॉयलॉग बाजीनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रितेशने म्हटलं की, ‘हे लातूर आहे पिल्लू, लातूरचा इंगा अजून बघितला नाही लोकांनी..’ तसेच ‘आपल्याला आपला हाथ भारी… दुसऱ्याला आपली लाथ भारी.. येत्या 23 तारखेला च्यामायला आपली लीडच लयं भारी, अशी जबरदस्त डॉयलॉग बाजीही केली..’

Assembly Election ‘लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस’

रितेशने अमित देशमुखांसाठी भाषण करताना म्हटलं की, नमस्कार.. गर्दी कुठपर्यंत आहे बाबा… खरंच ही तुफान गर्दी पाहून मला वेड लागलंय, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.. असं वाटतंय की, 23 तारखेचा जो निकाल आहे, तो आजच लागला आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मी खरं सांगू का..लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच बिग बॉस.. ते म्हणजे अमित भैय्या…

महायुतीच्या विजयनानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Assembly Election हे लातूर आहे पिल्लू

रितेश देशमुखने भाषणात म्हटलं की, ‘आपला उमेदवार एक नंबर, लिस्टमध्ये नाव एक नंबर आणि महाराष्ट्रामध्ये लीडपण एक नंबर लागली पाहिजे. हे लातूर आहे पिल्लू, लातूरचा इंगा अजून बघितला नाही लोकांनी… तो इंगा दाखवण्याची वेळ आता आलीये..ती धडकी, ती भीती…भैय्या तुम्ही म्हणलात विरोधकांचं नाव घेऊन त्यांना चर्चेत आणायचं नाहीये…ही गर्दी पाहून ती चर्चा इथंच संपली…इथंच निकाल लागलाय..’

Assembly Election महाराष्ट्राच्या अपेक्षा

युवकांची साथ ज्याला असते त्याचा विजय निश्चित असतो हे येत्या 20 तारखेला तुम्ही करुन दाखवा…15 वर्ष तुम्ही लातूरकर म्हणून प्रामाणिकपणे स्वप्न पाहिली आहेत, त्याला आता फळं येणार आहेत..अमित भैय्याकडून फक्त लातूरच्या नाही तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत… ते लातूरचंच नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत, अशी लातूरकर म्हणून माझी इच्छा आहेच.. तुमचीही असावी..जसं साहेबांनी प्रामाणिकपणे काम केलं तसंच अमित भैय्याही करत आहेत, करत राहतील..आपल्याला आपला हाथ भारी… दुसऱ्याला आपली लाथ भारी.. येत्या 23 तारखेला च्यामायला आपली लीडच लयं भारी’, असं म्हणत रितेशने विरोधकांना फिल्मी स्टाईलने धुतलं..

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img