महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) धर्तीवर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कल समोर आले आहेत. मुंबईतच्या वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची आघाडी असल्याचं दिसून आलं. आदित्य ठाकरे हे पुढे आहेत, तर मिलिंद देवरा पिछाडीवर आहेत.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी राजभवनात नाही? तर नेमका कुठे होणार
मुंबईतील वरळी मतदारसंघाने कायमच राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वरळी शहराशी प्रमुख भागांना जोडते. त्यामुळे या मतदारसंघाचं महत्व वाढलंय. वरळी मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेनं विजयाचा गुलाल उधळलाय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात मागील निवडणुकीत 89248 मतांनी विजय मिळवला होता. यंदाच्या आदित्य ठाकरे यांच्यापुढे मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं कडवं आव्हान आहे. या तिरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.