13.3 C
New York

Aditi Tatkare : श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल

Published:

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल (Shrivardhan Election Result 2024) जाहीर होत आहे. दरम्यान श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येतेय. विजयाच्या दिशेने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे (Aditi Tatkare) वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत आदिती तटकरे यांना 73,949 मतं मिळाली आहेत.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून ही मोठी बातमी आहे. श्रीवर्धनमधून पुन्हा एकदा आदिती तटकरे विजयी होऊ शकतात. आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघाच्या संभाव्य आमदार आहे. आदिती तटकरे या पुन्हा एकदा गड राखणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

पुण्यात ‘तुतारी’चा आवाज बसला; दिग्गजांची पिछाडी कायम

माअजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांची लढत शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांच्याशी होत आहे. नवगणे यांना 19500 आतापर्यंत मताधिक्य मिळालेलं आहे. आदिती तटकरे या सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत. तटकरे कुटुंबाचा या मतदारसंघात पूर्वीपासून दबदबा आहे.

रायगडमधील श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झालेली आहे. शरद पवार गटाचे अनिल नवगणे निवडणुकीच्या रिंगणात नवखे आहेत. कदाचित आज कमी मताधिक्यामुळे अनिल नवगणे यांना पराभव स्विकारावा लागू शकतो. याचसोबत लाडकी बहीण योजनेचा फायदा आदिती तटकरे यांनी मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img