3.8 C
New York

Exit Poll : जनतेच्या मनातला CM कोण? शिंदे, फडणवीस, दादा की नाना? आश्चर्यकारक माहिती..

Published:

विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या सर्व धामधुमीत अॅक्सिस माय इंडियाचा पोल समोर आला नव्हता. परंतु, आता ॲक्सिस माय इंडियानेदेखील त्यांचा पोल जाहीर केला असून, राज्यातील बहुसंख्य मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असे सांगण्यात आले आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला राज्यात 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, वंचित बहुजन आघाडीला शून्य तर, अन्य पक्षांना 6 ते 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. त्यानुसार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेची पसंती मिळाली आहे. अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या सर्वेक्षणात जनतेने मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती दिली याचंही उत्तर मिळालं आहे.

राज्यात मतमोजणी कशी होणार, किती वाजता येणार पहिला कल?

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून 31 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पसंती दिली आहे. महायुतीत शिंदे याबाबतीत अव्वल ठरले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंना 18 टक्के मतं मिळाली आहेत. या क्रमवारीत ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

Exit Poll फडणवीसांचा नंबर तिसरा

तिसरा क्रमांक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) मिळाला आहे. फडणवीसांना राज्यातील 12 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विशेष म्हणजे पसंती मिळाली आहे. राज्यातील पाच टक्के लोकांना शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही मुख्यमंत्री म्हणून तीन टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांना प्रत्येकी दोन टक्के मतं मिळाली आहेत. याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची दोन टक्के लोकांची इच्छा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img