3.5 C
New York

Sanjay Raut : ‘..तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल’; संजय राऊतांचा थेट इशारा

Published:

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. मात्र त्याआधीच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. मतदानानंतरच्या काही एक्झिट पोल्सने महायुती तर काही पोल्समध्ये महाविकास आघाडीला कौल राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यामुळे दोन्हीकडील नेते मंडळी अलर्ट मोडवर आहेत. बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. या घडामोडी घडत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार असल्याचा दावा केला. तसेच जर राज्यात आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच घेतला जाईल असे सांगितले. आता त्यांचा हा इशारा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला दिला गेला याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सीएनजीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय मुंबईतून होईल की दिल्लीतून असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईतच आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते सु्द्धा दिल्लीतून महाराष्ट्रात येतील. आम्ही कोणताही वेळ न घालवता आम्ही मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते निर्घृण लोक आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img