3.8 C
New York

Exit Poll :  महायुती-मविआ अलर्ट! मॅरेथॉन बैठका, हॉटेल खोल्या अन् स्पेशल विमाने बुक, स्ट्रॅटेजी काय?

Published:

विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Exit Poll) उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहे. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीतील नेते मंडळी अलर्ट आहेत. या निवडणुकीत बंडखोर किंगमेकर ठरणार असल्याचाही अंदाज आहे त्यामुळे या बंडोबांशी आतापासूनच संपर्क साधण्यात येत आहे. तर खास विमाने आणि हॉटेल्स काही दगाफटका ऐनवेळी होऊ नये यासाठी बुक करण्यात आली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत.

यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारी महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. जर काठावरचं बहुमत मिळालं तर सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

राज्यात मतमोजणी कशी होणार, किती वाजता येणार पहिला कल?

भाजपने सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत. सन 2022 मध्ये शिवसेनेत फूट होऊन पक्षाच्या आमदारांनी थेट गुवाहाटी गाठली होती. त्यामुळे पक्षाचे आमदार फुटू नयेत याची काळजी आघाडीतील मित्र पक्ष घेत आहेत. काँग्रेसने तर आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था केली असून निकालानंतर या आमदारांना काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Exit Poll अॅक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?

विधानसभेच्या 288 जागांसाठी काल (दि.20) मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, अॅक्सिस माय इंडियाचा पोल या सर्व धामधुमित समोर आला नव्हता. परंतु, आता ॲक्सिस माय इंडियानेदेखील त्यांचा पोल जाहीर केला असून, राज्यातील बहुसंख्य मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असे सांगण्यात आले आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला राज्यात 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, वंचित बहुजन आघाडीला शून्य तर, अन्य पक्षांना 6 ते 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img