महायुतीकडून अरक्षांना पैशांची ऑफर, याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत – संजय राऊत
महायुतीकडून अरक्षांना पैशांची ऑफर, याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत…. शेकाप, सपाचे आमदार देखील निवडून येत आहेत… एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही… सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले विजयाचे बॅनर….
मंगेश चव्हाण आमदार पदी पुन्हा एकदा नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर शहरात झळकले… भाजप युवा मोर्चाकडून शहरात मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले… निकालाला एक दिवस बाकी असताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला… विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असाही बॅनर वर उल्लेख… चाळीसगाव विधानसभेत भाजपचे मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उबाठाचे उन्मेश पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता….
परळीत राड्याप्रकरणात 40 जणांवर गुन्हा
परळी मतदारसंघातील घाटनांदुर मतदान केंद्रावर झालेल्या घटनेबाबत पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. 40 जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
जिकडे एकनाथ शिंदे, तिकडे आम्ही
एकनाथ शिंदे हे जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांचं शर्ट पकडून जायला तयार आहोत, सत्ता स्थापनेवरून संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य आलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे शरद पवार यांच्याकडे गेले तर काय कराल या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मतांचा टक्का वाढला, त्याचा फायदा आम्हाला – चंद्रशेखर बावनकुळे
“लाडकी बहिण, शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलय. मतांचा टक्का वाढला, त्याचा फायदा आम्हाला होईल” असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
एक्झीट पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज
पोल डायरीच्या एक्झीट पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 77-108 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) 18-28 उमेदवार जिंकतील, असा अंदाज पोल डायरीने त्यांच्या एक्झीट पोलमधून वर्तवला आहे.
पी मार्कचा एक्झिट पोल, महायुतीला किती जागा?
पी मार्कचा एक्झिट पोलसमोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे
Baramati : मतदारांवर दबाव टाकून मतदान सुरू असल्याचा आरोप युगेंद्र पवारांनी केला…
23 तारखेला राज्यात तुतारी वाजेल असा विश्वास. याशिवाय शर्मिला पवारांनीदेखील अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांचे कार्यकर्ते दमदाटी करून मतदान करीत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. या आरोपानंतर अजित पवार बारामती मतदान केंद्रावर पोहचले. अजित पवारांच्या पक्षाचे बारामती मतदान केंद्राचे पोलिंग एजेंट यांनाच धमकी दिल्याचा विडियो सध्या मध्यमांवर प्रसारित होत आहे.
यावर अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी चुकीचे वक्तव्य केले नाही. मला माझ्या कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यासोबत त्यांनी शर्मिला पवारांच्या आरोपांना धादांत खोटा आरोप म्हंटले आहे.
Maharashtra Election : संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा केली टीका…
राज ठाकरे यांनी त्यांचं राजकारण करावं, मी त्यांचं राजकारण गेल्या 25-30 वर्षे पाहत आलोय. ते राजकारण करतात की दुसऱ्या पक्षाचे गचकरण खाजवतात हे काही मला माहीत नाही. त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे मराठी माणसांसाठी काही करत नाही म्हणून उदयास आला पण ते आता मराठी माणसांचा घास गिळणाऱ्या मोदी-शाह-फडणवीस यांची पालखी उचलतायत, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Maharashtra Election Update : राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगावर लावले आरोप…
राहुल नारवेकरांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना फोन करून वृद्ध लोकांना मतदान केंद्रावर कोणत्याही सोयी नसल्याची तक्रार त्यांनी केली.
Maharashtra Election : नारायण राणे यांनी कणकवलीत बजावला मताधिकार…
दोन्ही मुलांना मंत्रिपद मिळालं तर माझ्यासारखा आनंदी बाप दूसरा कोणी नसेल…
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांची निवडणूक आयोगाकडे शिर्डीत बोगस मतदान झाल्याची तक्रार…
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून बोगस मतदान झाल्याचे आरोप. हे महाविद्यालयीन विद्यार्थी परराज्यातील असल्याचा शिर्डी मतदारसंघातील कॉँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोंगरेंनी केला आरोप.
Maharashtra Election : अभिनेते अनुपम खेर यांनी केले मतदान…
Maharashtra Election : उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार बजावला मताधिकार…
Maharashtra Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मतदान…
आजचा दिवस लोकशाहीच्या उत्सवाचा. सर्व मतदारांनी या उत्सवात सहभागी व्हावं. 2019 मध्ये जनतेच्या अपेक्षेविरुद्ध सरकार स्थापन झालं होतं. राज्यातील मतदानाचा टक्का वाढायला हवा. महाराष्ट्राच्या जनतेने सरकारचा कारभार पहिला आहे. 2019 ची घटना जनता विसरलेली नाही. जनता विकासाला भरभरून मतदान करेल. गेल्या अडीच वर्षातील विकास जनतेने बघितला आहे.
Maharashtra Election : कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले मतदान…
Nana Patole : बीटकॉईन प्रकरणातील आरोपा वर नाना पाटोलेंची प्रतिक्रिया…
बीटकॉईन संदर्भातील आरोपानंतर नाना पाटोलेंनी ऐकवली ऑडिओ क्लिप. ऑडिओ क्लिपमधील आवाज माझ्या नसल्याचा दावा त्यांनी केला असून त्याची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.
Raj Thackeray : वरळीत शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा नाही…
राज ठाकरेंनी मतदारांना मत देण्याचे केले आवाहन. निवडणुकीत खूप गोंधळ उडेल हे आधीच सांगितले असल्याची व्यक्त केली भावना.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनीही बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.
महामतपरीक्षा, ९.७० कोटी एकूण मतदार, एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे
९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे.z
पंतप्रधान मोदींकडून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी आज मतदान होत आहे. मी राज्यातील मतदारांना आवाहन करतो की त्यांनी पूर्ण उत्साहाने सहभागी होऊन लोकशाहीच्या उत्सवात हातभार लावावा. यावेळी सर्व तरुण व महिला मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात, अजित पवारांनी बजावला हक्क
अजित पवार व त्यांच्या पत्नी सकाळी सात वाजता मतदान केद्रावर दाखल
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.