24 तासापेक्षा कमी कालावधी बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता उरला आहे. बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. मागच्या 30 वर्षातील सर्वाधिक मतदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत झालं आहे. जवळपास 66 टक्के मतदान झालं आहे. हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सामान्यत: वाढलेल्या मतदानाचा अर्थ असा काढला जातो की, हा परिणाम विद्यमान प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा आहे. पण महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली. त्याशिवाय अन्य कल्याणकारी योजना सुरु केल्या. लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. अन्य योजना मोफत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. मतदानाची वाढती टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार? हे आता उद्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
विविध एक्झिट पोल्सचे निष्कर्ष मतदान पार पडल्यानंतर समोर आले. अगदी काही एक्झिट पोल्सचे आकडे कालही समोर आले. महायुती बहुतांश एक्झिट पोल्सनी पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. निकालाच चित्र काय आहे? ते उद्या स्पष्ट होईल. सध्याच महाराष्ट्रातील चित्र असं आहे की, यावेळी सात प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक झाली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. अपक्षांची मदत निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी लागेल असा अंदाज आहे. महायुतीने आता तीच शक्यता लक्षात घेऊन पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे
राज्यात मतमोजणी कशी होणार, किती वाजता येणार पहिला कल?
Eknath Shinde एकनाथ शिंदेंनी काय पाऊल उचललं?
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एक्शन मोडमध्ये आले आहेत. अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर सोपवली आहे. महायुती साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. निवडणूक जिंकण्याच्या दिसणाऱ्या स्थितीत आपल्या विश्वासू नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवल्याची माहीती आहे.
Eknath Shinde भाजप नेते सक्रीय
भाजप नेते दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी सक्रीय झाल्याची माहीती आहे. पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.