4 C
New York

Nashik Constituency : नाशिक शहरात निकालानंतर मिरवणूक काढण्यास बंदी

Published:

Maharashtra Vidhansabha Result : यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही सुरुवातीपासूनच चर्चेची आणि महत्त्वाची होती. आता पर्यंत २० तारखेची उत्सुकता सगळ्यांना होती मात्र मतदान झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष हे २३ तारखेच्या सुरुवातीला लागली आहे. आपलाच उमेदवार विजयी होईल असं प्रत्येकानं वाटत आहे त्यामुळे अनेक गावोगावी आणि ग्रामीण भागात “भावी मुख्यमंत्री” अश्या आशयाचे बॅनर देखील लागले आहेत. त्यामुळे निकालानंतर मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्याचं नियोजन सर्वच मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास नाशिक पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

नाशिक शहरातील प्रत्येक उमेदवारांचे कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.निवडणूक निकालाच्या भूमीवर नाशिक शहर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून या गोष्टींची खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांकडू योग्य ती जवाबदारी घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघ हा चर्चेचा मतदारसंघ होताच. त्याचबरोबर नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य आणि इतरही भागात चुरशीची लढत पाहायला मिळाली. २० तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडली.त्यावेळी देखील अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती मात्र तरी देखील शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरकृत्य झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे निकालादरम्यान, अस कोणतेही प्रकार घडू नयेत. म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

२८८ मतदारसंघात ४१३६ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रात उद्या सर्वत्र जल्लोषाचं वातावरणं पाहायला मिळणार आहे. मात्र नाशिक शहरात उद्या निवडणूक निकालानंतर रॅली किंवा मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, नाशिक शहरातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला कुठे तरी आळा बसण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img