4 C
New York

Bala Nandgaonkar : बाळा नांदगावकरांनी सांगितलं फडणवीसांच्या भेटीमागचं कारण म्हणाले….

Published:

राज्याच्या (Maharashtra Assembly Election Result 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकस आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आले आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना भाजपच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

विधानसभेच्या निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, या प्रमुख नेत्यांचा समावेश असून निकालाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे राजकीय खलबतं होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकरही (Bala Nandgaonkar) या बैठकीत सहभागी झाले होते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली होती.

निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येणार; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

मनसेने बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. उद्या मतमोजणी असून तत्पुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची बाळा नांदगावकर यांनी आज भेट घेतली. या भेटीबद्दल त्यांनी आता माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाचं लग्न आहे. म्हणून ते सकाळी राज ठाकरेंकडे आले होते. त्यांनी राज ठाकरेंना पत्रिका दिल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांकडे पत्रिका द्यायला जात होते. ते म्हणाले की चला सोबत, म्हणून मीही त्यांच्याबरोबर आलो. ते पुढे म्हणाले, “या भेटीदरम्यान मी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. तसंच, निवडणुकीत त्यांनी मला पाठिंबाही दिला होता, म्हणून मी त्यांचे आभार मानले.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img