आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) आणि संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हेग येथील या न्यायालयाने हे वॉरंट गाझा आणि लेबनॉनमधील युद्धात (Lebanon War) झालेल्या युद्ध अपराधांची दखल घेऊन बजावण्यत आले आहे. इतकेच नाही तर हमास प्रमुखालाही युद्ध अपराधी म्हणून (Israel Hamas War) घोषित करण्यात आले असून त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. बेंजामिन नेतन्याहू आणि योआव गॅलंट या दोघांनी युद्धातील अपराधांसाठी जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांच्यावर मानवते विरुद्ध गुन्हा केल्याचा आरोप ठेवला आहे. यामध्ये अत्याचार, हत्या आणि अमानवीय कृत्यांचा समावेश आहे. तसेच युद्धाची पद्धत म्हणून उपासमार देखील युद्ध अपराधात समाविष्ट आहे.
प्रचारा दरम्यान करण्यात आलेल्या ‘या’ विधानांवर निवडणूक आयोग कारवाई करणार
न्यायालयाच्या या भूमिकेवर इस्त्रायलनेही प्रतिक्रिया दिली आहे. इस्त्रायलने आपल्या नेत्यांवर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येत नाही. इस्त्रायलचे प्रमुख विरोधी पक्षनेते यायर लिपीड यांनी देखील न्यायालयाच्या या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही या अटक वॉरंटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात सध्या एक फ्रांसीसी न्यायाधीश नेतृत्व करत आहेत. या अपमानजनक अपराधाची पुनरावृत्ती झाली आहे. मी आणि माजी संरक्षण मंत्र्यांवर जाणूनबुजून खोटे आरोप लावण्यात आले आहेत.
आम्ही आमच्या नागरिकांना वाचविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावून प्रयत्न करत असताना आमच्यावर असे खोटे आरोप केले जात आहेत. इस्त्रायलने गाझातील नागरिकांसाठी जवळपास सात लाख टन खाद्यपदार्थ दिले आहेत. तरी देखील आंतरराष्ट्रीय न्यायालय गाझातील लोकांची उपासमार केल्याचा आरोप आमच्यावर करत आहे, असे नेतन्याहू म्हणाले.