काल 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रियापार पडली. आता सर्वाचं लक्ष 23 नोव्हेंबरकडे लागलंय. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नेमका कोणाला आता मतदारांनी कौल दिलाय, सर्वांना याची उत्सुकता (Mahayuti) आहे. तुरळक अपवाद राज्यात वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलंय. राज्यातील काही भागात हायव्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या आहेत. मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. परंतु अनेकदा हे अंदाज देखील फसवे ठरतात. संपूर्ण महाराष्ट्राचं (Mahavikas Aghadi) लक्ष लागलेल्या हायव्होल्टेज फाईट्स कोणत्या होत्या, हे आपण जाणून घेऊ या.
Assembly Election 2024 मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरी पाचपाखाडीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे केदार दिघे मैदानात आहेत. त्यानंतर माहिम विधानसभा मतदारसंघाकडे देखील बिग फाईट म्हणून पाहिलं जातंय. तिथे अमित ठाकरे यांची प्रतिष्ठा मनसेचे पणाला लागलेली आहे. याच मतदारसंघात महेश सावंत देखील रिंगणात आहेत. वरळीत अन् ठाण्यात देखील तिहेरी लढत पाहायला मिळाली. आपलं नशीब वरळीत मिलिंद देवरा शिंदे गटाचे, आदित्य ठाकरे ठाकरे गटाचे आणि संदीप देशपांडे मनसेचे आजमावत आहेत. झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत दुसरीकडे वांद्रे पूर्वमध्ये झाली आहे. शिंदे गटाचे संजय केळकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात ठाण्यात अटीतटीची लढत झाली. तर निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना कोकणात कुडाळमध्ये रंगला.
Assembly Election 2024 बारामती, कागलच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार बारामतीत अशी ‘काका-पुतण्यांची थेट लढत झाली.तर मावळमध्ये सुनिल शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी थेट लढत झाली. यानंतर सगळ्यात हाय व्हॉल्टेज लढत कागल विधानसभा मतदारसंघातली होती. दोन कट्टर विरोधक, राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या पक्षाकडून समरजीत घाटगे आमने-सामने आहेत. या मतदारसंघात 81 टक्क्यांहून अधिक मतदान झालंय.
Assembly Election 2024 कोल्हापूर उत्तर अन् सांगोल्यात कुणाची बाजी?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. तेथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली आणि काँग्रेसने अपक्ष राजू लाटकर यांना पाठिंबा दिला. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे. शहाजीबापू पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे दीपक साळुंखे यांच्यात सांगोल्यात शिवसेनेचे चुरशीची लढत आहे.
सांगलीच्या कवठेमहांकाळ विधानसमभा मतदारसंघात ‘संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील’ ही देखील एक बिग फाईट आहे.कर्जत जामखेडच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत झाली.
राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय
Assembly Election 2024 नांदगावमध्ये राडा
नांदगावमध्ये मात्र हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही तिहेरी लढत तेथे सुहास कांदे, गणेश धात्रक अन् समीर भुजबळ पाहायला मिळाली सुहास कांदेंनी ‘तुझा मर्डर फिक्स आहे’ अशी थेट धमकीच समीर भुजबळांना दिल्याचं समोर आलं. मराठवाड्यात परांडा विधानसभेत तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे लढत झाली. तर बार्शी मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र राऊत यांच्यासमोर ठाकरे गटाच्या दिलीप सोपल यांचं कडवं आव्हान आहे. विदर्भातील रामटेकमध्ये आशिष जैस्वाल विरुद्ध विशाल बरबटे यांच्यात लढत आहे. विदर्भातील सावनेर विधानसभा मतदारसंघात आशिष देशमुखांविरोधात अनुजा केदार असा सामना रंगला आहे.
Assembly Election 2024 राज्यातील इतर महत्वाच्या बिग फाईट्स
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – गुलाबराव देवकर विरूद्ध गुलाबराव पाटील
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ – रोहिणी खडसे विरूद्ध चंद्रकांत पाटील
मालेगावर बाह्य विधानसभा मतदारसंघ – दादा भुसे विरूद्ध अद्वय हिरे
येवला विधानसभा मतदारसंघ – माणिकराव शिंदे विरूद्ध छगन भुजबळ
राजापूर विधानसभा मतदारसंघ – राजन साळवी विरूद्ध किरम सामंत
कुडाळ विधानसभा मतदारसंघ – वैभव नाईक विरूद्ध निलेश राणे
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ – राजन तेली विरूद्ध दीपक केसरकर
कणकवली विधानसभा मतदारसंघ – नितेश राणे विरूद्ध संदेश पारकर
बेलापूर विधानसभा मतदारसंघ – संदीप नाईक विरूद्ध मंदा म्हात्रे
ऐरोली विधानसभा मतदारसंघ – एम के मढवी वि. विजय चौगुले विरूद्ध गणेश नाईक
मिरा भायंदर विधानसभा मतदारसंघ – गीता जैन विरूद्ध नरेंद्र मेहता
इंदापूर विधानसभा मतदारसंघ –हर्षवर्धन पाटील विरूद्ध दत्ता भरणे
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ – देवदत्त निकम विरूद्ध दिलीप वळसे पाटील
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – ऋतुराज पाटील विरूद्ध अमल महाडिक
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ – भगिरथ भालके विरूद्ध समाधान औताडे
लातूर विधानसभा मतदारसंघ – अमित देशमुख विरूद्ध अर्चना पाटील चाकूरकर
जालना विधानसभा मतदारसंघ – कैलास गोरंट्याल विरूद्ध अर्जुन खोतक
भोकरदन विधानसभा मतदारसंघ – चंद्रकांत दानवे विरूद्ध संतोष दानवे
कन्नड विधानसभा मतदारसंघ – हर्षवर्धन जाधव विरूद्ध संजना जाधव
परळी विधानसभा मतदारसंघ – राजेसाहेब देशमुख विरूद्ध धनंजय मुंडे
दिंडोशी विधानसभा मतदारसंघ – सुनिल प्रभू विरूद्ध संजय निरुपम
मानखूर्द -शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ – नबाव मलिक विरूद्ध अबु आझमी
शिवडी विधानसभा मतदारसंघ – बाळा नांदगावकर विरूद्ध अजय चौधरी
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ – अमिन पटेल विरूद्ध शायना एनसी
अणुशक्तिनगर विधानसभा मतदारसंघ – सना मलिक विरूद्ध फहाद अहमद
दिग्रस विधानसभा मतदारसंघ- संजय राठोड विरूद्ध माणिकराव ठाकरे