राज्यात काल विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान 20 नोव्हेंबर 2024 पार पडलंय. आता राज्यात नेमकं कोणाचं सरकार स्थापन होतंय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे अंदाज मतदान झाल्यानंतर समोक आले (Maharashtra Assembly Election Result 2024) आहे. निकालाची शक्यता ‘एक्झिट पोल’ने वर्तविलेली आहे, हा पोलचा अंदाज परंतु अनेकदा चुकलेला दिसतो. त्यामुळे सर्वांना 23 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
Assembly Election 2024 महाविकास आघाडीचं सरकार आल्यास…
महायुती किंवा महाविकास आघाडीला सर्वात मोठी शक्यता म्हणजे स्पष्ट बहुमत मिळणार आहे, नवं सरकार असं झाल्यास आठ दिवसांच्या आतंच स्थापन होऊ शकतं. मग यामध्ये (Maharashtra Goverment)एका पक्षाकडे मुख्यमंत्रिपद आणि इतर दोन पक्षांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीत कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं नव्हतं, तेव्हा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यामुळे जर आता महाविकास आघाडीची सत्ता आल्यास, मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल
Assembly Election 2024 महायुतीचं सरकार आल्यास…
महायुतीचे सरकार आल्यास पक्षाला मुख्यमंत्रिपद आणि इतर दोन पक्षांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल, हेच सूत्र कायम असेल. परंतु, मुख्यमंत्रिपद संख्याबळाच्या आधारावर दिलं जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय. पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं, तर देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, असा अंदाज वर्तवला जातोय. परंतु जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. तर एकनाथ शिंदेंचे राजकीय पुनर्वसन कसं केलं जाईल, हा प्रश्न उपस्थित होणार आहे.
परंतु जर 2019 च्या विधानसभा निवडणूकीप्रमाणे दोन्ही पक्षांना बहुमत मिळालं तरी त्याचंच सरकार येईल का? हा प्रश्न देखील सध्या राजकीय वर्तुळात आहे. 2024 मध्ये पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती होणार का? ही देखील चिंतेची बाब आहे. 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे. आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय, हे तेवीस तारखेलाच स्पष्ट होणार आहे. परंतु, निकालामध्ये कोणालाही बहुमत मिळालं नाही, तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल सर्वांत मोठ्या पक्षाला बोलवतील.