विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मतदान प्रक्रिया राज्यात काल 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान झालंय. तर सर्वांत कमी आणि सर्वात जास्त मतदान कुठे झालं, हे आपण जाणून घेऊ या.
राज्यात काल 288 विधानसभा मतदारसंघात मतदान झालंय. सर्वात जास्त मतदान कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात झालं आहे. कोल्हापूरमध्ये 76.25 टक्के मतदान झालंय, तर मुंबई शहर विधानसभा मतदारसंघात 52.07 टक्के मतदान झालेलं आहे. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यात विशेष प्रयत्न केले होते. अनेक मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती झालेल्या आहेत.
Assembly Election राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर विधानसभा मतदारसंघ – 71.73 टक्के,
अकोला विधानसभा मतदारसंघ – 64.98 टक्के,
अमरावती विधानसभा मतदारसंघ – 65.57 टक्के,
औरंगाबाद विधानसभा मतदारसंघ – 68.89 टक्के,
बीड विधानसभा मतदारसंघ – 69.79 टक्के,
भंडारा विधानसभा मतदारसंघ – 69.42 टक्के,
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ – 70.32 टक्के,
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ – 71.27 टक्के,
धुळे विधानसभा मतदारसंघ – 64.70 टक्के,
गडचिरोली विधानसभा मतदारसंघ – 73.68 टक्के,
गोंदिया विधानसभा मतदारसंघ – 69.53 टक्के,
सत्ता कुणाची येणार? राऊत म्हणाले…
हिंगोली विधानसभा मतदारसंघ – 71.10 टक्के,
जळगाव विधानसभा मतदारसंघ – 64.42 टक्के,
जालना विधानसभा मतदारसंघ – 72.30 टक्के,
कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ – 76.25 टक्के,
लातूर विधानसभा मतदारसंघ – 66.92 टक्के,
मुंबई शहर विधानसभा मतदारसंघ – 52.07 टक्के,
मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघ – 55.77 टक्के,
नागपूर विधानसभा मतदारसंघ – 60.49 टक्के,
नांदेड विधानसभा मतदारसंघ – 64.92 टक्के,
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ – 69.15 टक्के,
नाशिक विधानसभा मतदारसंघ- 67.57 टक्के,
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ – 64.26 टक्के,
पालघर विधानसभा मतदारसंघ – 65.95 टक्के,
परभणी विधानसभा मतदारसंघ – 70.38 टक्के,
पुणे विधानसभा मतदारसंघ – 61.05 टक्के,
रायगड विधानसभा मतदारसंघ – 67.23 टक्के,
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ – 64.55 टक्के,
सांगली विधानसभा मतदारसंघ – 71.89 टक्के,
सातारा विधानसभा मतदारसंघ – 71.71 टक्के,
सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ – 68.40 टक्के,
सोलापूर विधानसभा मतदारसंघ – 67.36 टक्के,
ठाणे विधानसभा मतदारसंघ – 65.05 टक्के,
वर्धा विधानसभा मतदारसंघ – 68.30 टक्के,
वाशिम विधानसभा मतदारसंघ – 66.01 टक्के,
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ – 69.02 टक्के मतदान झाले आहे.