राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडली. काल संध्याकाळी विविध एजन्सीचे पोल आले आहेत. महायुतीची सत्ता येणार यात काही पोलमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार असं तर काही एजन्सीमध्ये दिसतं आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या एक्झिट पोलवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
Chhagan Bhujbal एक्झिट पोलवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
तीन-चार कंपन्यांचे एक्झिट पोल आले. तीन कंपनी त्यामध्ये आहे त्यांचं नावाचे उल्लेख करता येते. महायुतीच्या बाजूने कौल दिलाय यांचे सरकार बनते. सहा महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणारी योजना आहे. बारा हजार वरून पंधरा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेत केले. मुलींना फुकट शिक्षण देण्याची योजना आहे. शेतकऱ्यांना एक रुपया घेत लाख दहा लाख रुपये पर्यंत पीक विमा दिला. महिलांसाठी अर्धा एसटीचे भाडे आहे. त्यामुळे लोकांना या योजनांचा फायदा झाला आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; यूएसमध्ये लाचखोरी आणि फसवणूकीचे आरोप, अटक वॉरंट जारी
Chhagan Bhujbal लोकांचा महायुतीवर विश्वास- भुजबळ
महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ. अर्ध एसटीची भाडे पूर्ण पणे माफ करू.वर्षा योजनेचा वृद्धांना बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये करू. अश्या काही गोष्टी आम्ही अमलात आणल्या. विकास कामे भरपूर मोठ्या प्रमाणात झाले. समृद्धी महामार्ग असेल. मुंबईमधले अनेक टर्नर्स आपण केले त्यातून फार सुधारणा, डेव्हलपमेंट विकास झाला आहे. या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रमध्ये जो काही कल होता. तो आता बदललेला आहे. त्यावेळी लोकसभेला संविधान अमुकतमुक अशा अनेक गोष्टीचे गैरसमज पसरवल्या गेला. पण आता लोक महायुतीला कल देतील, असं भुजबळांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिले. त्यांनी संविधान जे आहे. उच्च स्थानावर ठेवून नमस्कार करून डोकं ठेवून या संविधानाला जगात कोणीही बदलू शकत नाही. एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. त्याचा परिणाम असा झाला की जो काही मागच्या वेळी फटका बसला. महाराष्ट्र मध्ये घडले तेथून महाराष्ट्र पुन्हा एकदा मागे फिरला महायुतीच्या पाठीमागे उभा राहतोय असं चित्र आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.