Vidhansabha Election 2024 : आज महाराष्ट्रात लोकशाहीचा जल्लोष साजरा केला जात आहे. २८८ मतदारसंघात ४१३६ उमेदवारांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे, तर मतदारराजाची गर्दी ही केंद्रावर पाहायला मिळत आहे. मतदान झाल्यानंतर आपल्या डाव्या तर्जनीवर निळ्या रंगाची शाई लावली जाते. बोटावरील असलेलेली निळ्या रंगाची शाई आपल्या मतदान चिन्हांमध्ये समाविष्ट करण्यात येते. पण आपल्या बोटावर निळी शाई का लावली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? चला तर आज या बद्दल जाणून घेऊ..
मतदानाच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या डाव्या तर्जनीवर निळ्या रंगाची शाई लावली जाते. तुम्ही मतदान केलं आहात याचा हा पुरावा म्हणून ही शाई आपल्या बोटाला लावतात.प्रत्येक नागरिकाला एकदाच मतदान करण्याचा हक्क असतो म्हणजेच त्याच व्यक्तीला दुसऱ्यांदा मतदान करण्याचा हक्क नसतो. ही खूण कोणी मतदान केले किंवा नाही हे दर्शवते. ही शाई सुरुवातीला निळ्या- जांभळ्या रंगाची असते आणि त्यानंतर ती काळ्या रंगाची होते. ही शाई “इंडेलिबल शाई”म्हणून ओळखली जाते. म्हणजेच जी शाई पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी तयार केलेली असते जी खूण १५ दिवसांपर्यंत पुसली जात नाही.
ही शाई कुठे बनवली जाते ?
ही शाई केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात वापरली जाते. कर्नाटकातील म्हैसूर पेंटस् अॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये ही शाई तयार केली जाते. १९३७ साली कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर लेक आणि पेंट्स नावाचा कारखाना काढला. देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला शाई निर्माण करण्याचा आणि ती विकण्याचा अधिकार आहे.सुरुवातीच्या काळात मतदान केल्यानंतर दोनदा मतदान केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सातत्याने येत होत्या. या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने ते थांबणवण्याचे अनेक पर्यांयांचा विचार केला. पण १९६२ साली झालेल्या निवडणूकीत पहिल्यांदा ही शाई वापरण्यात आली. या आधी बोटाला शाई ऐवजी डाय लावला जायचा पण शाईचा शोध लागल्यानंतर मतदानानंतर प्रत्येक मतदाराच्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय हा कायमस्वरुपी करण्यात आला.
ही शाई पुसली का जात नाही ?
या निळ्या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट असते, जे त्वचेवर प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेतील प्रथिनांशी जुळत दाट आणि गडद डाग तयार करते. ही प्रक्रिया रासायनिकदृष्ट्या स्थिर असते म्हणून ही शाई पाण्याने, साबण्याने किंवा कोणत्याही प्रकार काढता येत नाही. शाईचा डाग हा त्वचेच्या थरांवर टिकतो आणि त्यानंतर नैसर्गिकरित्या तो नष्ट होतो. या प्रक्रियेला सर्वसाधारणपणे १० ते १५ दिवसांचा काळ जातो. ही शाई नख आणि त्वचा यावर लावली जाते. म्हणूनच ही शाई पुसली जात नाही.