राज्यात आज विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदान केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार (Ajit Pawar) याांच्यावर कोणता अन्याय झाला? असा सवाल शरद पवार यांनी माध्यमांसमोर केलाय. शरद पवार म्हणाले की, चार वेळी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना दिलंय. तरी मग त्यांच्यावर अन्याय झालाय, असं म्हणणं कितपत योग्य आहे.
बारामतीमध्ये प्रचार सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र वाचून दाखवलं होतं. या पत्रामध्ये अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, असा दावा करण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. सत्ता अजित पवार यांच्या ताब्यात होती. मग कोणी त्यांच्यावर अन्याय केला? अजित पवार यांच्याविरूद्ध युगेंद्र पवार नवखा उमेदवार आहे. त्यामुळे नेमका कोणी अन्याय केला? असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.
देवाला प्रसाद चालतो,’विनोद’ नाही; तावडे प्रकरणानंतर मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत
मतदान केल्यानंतर शरद पवार म्हणाले की, “लोकांनी मतदान करावे आणि मला विश्वास आहे की. महाराष्ट्रातील लोक मोठ्या संख्येने शांततेत मतदान करतील. 23 नोव्हेंबरनंतर कोणाला मतदान केले जाईल हे स्पष्ट होईल. राज्यात सरकार स्थापनेची जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपांबाबत ते म्हणाले की, आरोप करणारी व्यक्ती अनेक महिने तुरुंगात होती. त्या व्यक्तीला सोबत घेऊन खोटे आरोप करणे, हे फक्त भाजपच करू शकतं.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती झालेला भ्रष्टाचाराचा आरोप यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय. शरद पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप केलेत, त्या व्यक्तीची चौकशी करावी. तर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी प्रकार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.